बुलढाणा-वसीम शेख अनवर
बुलढाणा:- तरुणांचा गुन्हेगारीकडे वाढता कल हा समाजासाठी जेवढा घातक तेवढाच चिंतेचा आणि चिंतनाची बाब आहे. मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील तीन युवकांना पिस्तूल घेऊन काही गुन्हे करायचे होते परंतु सतर्क असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेने या तिन्ही युवकांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून दोन पिस्तूल सह 12 काडतूस जप्त केल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्याच्या मध्यप्रदेश सीमेजवळ काल संध्याकाळी 7 वाजेच्या दरम्यान ही कारवाई चोख पार पाडण्यात आली. बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्याच्या लागून मध्यप्रदेश आहे. अलीकडच्या राज्यातून मोठ्या प्रमाणात अवैध पिस्तूलच्या खरेदीचा काळा धंदा फोफावला आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या डोणगावच्या तीन युवकांकडून दोन पिस्तूल सह 12 काडतूस जप्त
काहीवेळा अंधारातील हा व्यवहार पोलिसांच्या सतर्कतेने उजेडात येतो. पण पोलिसांच्या नजरा चुकवून पिस्तुलांची खरेदीही होते. काल डोणगाव येथील तीन युवकांनी केलेली पिस्तूलची खरेदी पोलिसांच्या नजरेतून सुटू शकले नाही. स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली आणि पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी प्रमुख अशोक लांडे यांनी आपल्या दमदार पथकाकडे सदर कार्यवाहीची धुरा सोपविली.
बुलढाणा जिल्ह्याच्या डोणगावच्या तीन युवकांकडून दोन पिस्तूल सह 12 काडतूस जप्त
एपीआय आशिष रोही, एपीआय यशोदा कणसे, हेडकॉन्स्टेबल इजाज खान, हेड कॉन्स्टेबल दिगंबर कपाटे तसेच अनंत फरताळे, अजित परसु वाले, मंगेश सांगावे, दीपक वायाळ, पूजा जाधव, ऋषिकेश खंडेराव, चालक समाधान टेकाळे, विलास भोसले यांच्या पथकाने काल, शनिवार संध्याकाळपासूनच बऱ्हाणपूर जळगांव जामोद मार्गावर पेट्रोलिंग केली. मिळालेली गुप्त माहिती खरी होती. डोणगाव येथील संदीप संजय काटोने वय 25, सुनील रमेश बकाल वय 37 आणि शुभम गजानन मुळे वय 25 अशा तिघांना देशी बनावटीचे दोन गन पिस्तूल, तीन मॅक्झिन 12 जिवंत काडतूस सह पकडण्यात आले. तिन्ही आरोपी एका टीव्हीएस ज्युपिटर मोपेड बाईकवरून पिस्तूल घेऊन घराकडे निघाले होते. आरोपांची स्कुटीही ताब्यात घेण्यात आली आहे. एकूण 1 लाख 67 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
read also
पीएम मोदी का बड़ा ऐलान, दिल्ली में बीजेपी की प्रचंड जीत के बाद केजरीवाल की मुश्किलें बढ़ीं
दिल्ली चुनाव 2025: केजरीवाल की हार पर भावुक हुए अन्ना हजारे, नाराजगी जाहिर की
दिल्ली विधानसभा चुनाव में भाजपा की ऐतिहासिक जीत पर नवनीत राणा की प्रतिक्रिया











Leave a Reply